mahatourism
home konkan hill-stations forests temples caves
ramshej
 

नाशिक - पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. वनवासात असताना प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे अशी अख्यायिका आहे, म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेबाची १० हजाराची फौज रामशेजवर चाल करून आली, तेव्हा किल्ल्यावर केवळ ६०० मावळे होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. मोगलांच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचला, किल्ल्याच्य तटबंदीची किंवा एखाद्या बुरुजाची पडझड झाली तरी किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते. तब्बल ६५ महिने रामशेज अजिंक्य राहिला व मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले.

 
 

 
 

🏠 मोहोळे वाडा, रामशेज किल्ला 🌞

🌴🌴🌳🌳🌳🌴🌴 🌾निसर्गरम्य वातावरणात 🌻🌻 घरगुती फ्रेश 🌻🌻
♨️महाराष्ट्रीयन थाळी, झुणका / शेवभाजी भाकरी, भाजणी थालीपीठ, कांदा भजी, कढी भेळ अशा पारंपारिक शुध्द शाकाहारी पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्या ‼️
👍फॅमिली - ग्रुप डे पिकनिक, कॅम्पिंग साठी उत्तम व्यवस्था. तसेच स्वतःचे फूड पार्सल / स्वयपाक करणे असल्यास सर्व सुविधा उपलब्ध ‼️
🚖 चला तर गर्दीपासून दूर रामशेज या ऐतिहासिक स्थळी आणि अनुभवा किल्ल्याची महती व मन प्रफुल्लीत करणारा रानवारा ‼️

 
 

Contact : Mr. Prashant Mohole 9226869287


 
 
 
 
 
 
 


To Contact Us, Feedback & Advertise Your Property / Packages Click Here